लोकशाहीर अण्णा भाऊ साठे: समाज परिवर्तनाचे प्रेरणास्थान
नमस्कार मित्रांनो आज आपण आण्णा भाऊ साठे यांच्या विषयी माहिती बघणार आहोत .अण्णाभाऊ साठे हे एक महान मराठी साहित्यिक, समाजसुधारक आणि दलित चळवळीचे नेते होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरीबीत गेले. त्यांना फक्त दीड दिवसच शाळेत जाण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांच्यात साहित्यिक प्रतिभा लहानपणापासूनच दिसून येत होती. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे , तर आईचे नाव वाल्बाई होते.
आण्णा भाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते. तथापि त्यांनी प्रयत्न पूर्वक अक्षर ज्ञान मिळविले ,१९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले .चरितार्थासाठी त्यांनी कोळशे वेचणे , फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे गाठोडे घेऊन हिंडणे मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून काम केले .ते नंतर पक्षात घुसले .नंतर पक्षाचे हि काम करत व वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर घराची सगळी जबाब दारी त्यांच्या अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले तेथे बापू साठे या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले .
सामाजिक न्यायाचे प्रणेते आण्णाभाऊ साठे | दलित चेतनेचे धुरंधर आण्णाभाऊ साठे
आण्णाभाऊ साठे यांनी १९४४ साली शाहीर आमरशेख व शाहीर द .ना .गाव्ह्न कर यांच्या मदतीने लाल बावटा कला पथक स्थापन केले.या कलापथक यावर सरकारने बंदी घातली स्वतंत्र आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन, सयुक्त महाराष्ट्र चळवळ या आंदोलनात त्यांच्या कलापथकाने संपूर्ण महाराष्ट्र भर दोरा करून जनतेला जागृत करण्याची महत्वाची भूमिका निभवली .तर मित्रांनो आपण आण्णा भाऊ साठे यांचे साहित्य बघूया – कथा ,कादंबरी , लोकनाट्य ,नाटक, पटकथा ,लावणी पोवाडे प्रवास वर्णन आशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून लेखन केलेले आण्णा भाऊ साठे हे ख्यातनाम मराठी साहित्यिक होते .त्यांच्या एकूण ३५ कादंबऱ्या होत्या .१५ कथा संग्रह होते ११ नाटके व बरीच लोकनाट्य लहिली आपल्या लिखाणातून दलितांच्या दुखाला वाचा फोडली .
आण्णा भाऊ ची निरक्षर सक्ती अत्यंत सूक्ष्म होती .डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते .अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती पृथ्वी शेषच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तर्लेलेई आहे .आसे ते म्हणत आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्त्रोत होता .त्यांच्या पासून प्रेरणा देऊन दलित लेखकांची एक पेटी भवन पिढी निर्माण झाली .
आण्णाभाऊ साठे समाज परिवर्तनाचे साधक | मराठी साहित्याचा दलित
क्रांतिकारी आण्णाभाऊ साठे
आण्णा भाऊ साठे यांनी पस्तीस कादंबर्या लिहिल्या आहेत .चित्रा हि त्यांची पहिली कादंबरी आहे. फकीर, वारणेचा वाघ ,चिखलातील कमळ ,रानगंगा ,माकडाची माल वेजायांता ई कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या फकीर कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे कथा संग्रह जिवंत काडतूस ,आबी खूळवाडी बरबाध्य कांजारीचीरनागारची भूत ई उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलावंतीक ठरवले गेलेले. दलित आणि श्रमिक यांच्या समृद्धीचे स्वप्न आण्णा भाऊ पाहत आले.
आण्णा भाऊ साठे, शाहीर आमार शेख या तिघांनी लाल बावटा कला पथक स्थापन केले १९५८ साली मुंबई येथिल पहिल्या दलित साहित्य संमेलनात पृथ्वी हा शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तर्लेलेई आहे आसे विचार आण्णा भाऊ साठे यांनी मांडले. आण्णा भाऊ साठे यांची कविता = जग बदलूनी घालूनी द्याव,सांगून मेले मला भीमराव.साठे यांनी आपल्या लेखनातून समाजातील अन्याय, अत्याचार आणि शोषणाचा निषेध केला. त्यांनी दलित समाजाचे प्रश्न उचलून धरले आणि त्यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या लेखनातून दलित चेतना आणि समाज परिवर्तनाची आशा दिसून येते.
आण्णाभाऊ साठे दलित मुक्ति आंदोलनाचे पुरोधन | गरीबांचे गौरवगान गायक
भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावर आण्णा भाऊ साठे यांनी मुंबईत वीस हजार कामगार व दलित बांधवांचा मोर्चा काढला. “ये आझादी झुठी है, देश कि जनता भूखी है”.हि या मोर्चाची प्रमुख घोषणा होती. तर मुलांनो आपण आजच्या पोस्ट मधून आज आण्णा भाऊ साठे यांच्या विषयी थोडी माहिती बघितली आहे त्यांचे वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी निधन झाले आशा या थोर समाज सुधारक आण्णा भाऊ साठे यांच्या विषयी माहिती आपण आजच्या पोस्ट मधून मुलांना दिलेली आहे.आपण प्रतेक पोस्ट बनवताना मुलांचा सोप्या पद्धतीने आभ्यास कसा होईल याचा विचार केला आहे.
अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखकच नव्हते तर एक समाजसुधारकही होते. त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी समाजातल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन आजही प्रासंगिक आहे. त्यांच्या लेखनातून आपल्याला समाजातील अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा मिळते. त्यांचे लेखन आपल्याला मानवी मूल्यांचे महत्त्व समजावून सांगते. अण्णाभाऊ साठे यांचे निधन १८ जुलै १९६९ रोजी झाले. परंतु त्यांचे लेखन आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांचे योगदान मराठी साहित्याला आणि समाज सुधारणेच्या प्रयत्नांना अतुलनीय आहे.