डॉ दाजी भाऊ लाड
Dr.Bhau Daji Lad – नमस्कार मित्रांनो आज आपण डॉ दाजी भाऊ लाड या यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. चला तर मुलांनो आज आपण डॉ दाजी भाऊ लाड यांनी कोणती कार्य आहेत हे थोडक्यात माहिती करून घेऊयात.डॉ. भाऊ दाजी लाड हे एक महान भारतीय इतिहासकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञ डॉक्टर होते. डॉ दाजी भाऊ लाड त्यांचा जन्म व शिक्षण याच्याविषयी माहिती बघणार आहोत. ते अत्यंत हुशार होते आणि शालेय अभ्यासात उत्तम गुण मिळवले. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून शिक्षण घेतले. डॉ दाजी भाऊ लाड यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड हे होते. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १८२४ रोजी मांजरी येथे झाला. त्यांचे मूळ गाव गोव्याच्या पेडणे तालुक्यातील पार्से हे होते. उद्योग निमित्त त्यांचे वडील मुंबई येथे स्थायिक झाले होते. १८४० साली भाऊंनी एलिफस्टन महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला .इतिहास ,भूगोल , रासायनशास्त्र संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घेऊन एल्फिन्स्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून नोकरी केली.
Dr.Bhau Daji Lad यांचे शेक्षणिक कार्य
मुंबईच्या एलिफस्टन महाविद्ध्याल्यात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या ज्ञान प्रसारक सभेत भाऊ लाड यांनी काम करून या सभेला पप्रसिद्धीस आणले. १८४५ मध्ये मुंबईत ग्रांट मेडिकल कॉलेज ची स्थापना झाली या कॉलेजात प्रवेश घेऊन १८५१ साली भाऊ दाजी डॉक्टर बनले ggmc हि पदवी मिळाली कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी ओषधी शोधल्या मुळे त्यांना धन्वन्तरी आशे म्हटले जात होते. १८५२ साली मुंबईच्या बोर्ड ऑफ एजुकेशनचे सभासद मुहमद मक्बा निवृत्त झाले तेव्हा त्या जागी डॉ लाड यांची निवड झाली. डॉ भाऊ दाजी लाड यांनी विधवा पुनर्विवाहाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
समाज सुधारणा आणि ज्ञानपीठ
१८४८ मध्ये ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष बनल्या नंतर या संस्थे मार्फत भौनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती साठी प्रयत्न करताना त्यांनी मुलींसाठी शाळा सुरु केल्या. १८५२ मध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोशियाशन हि भारतातील पहिली राजकीय संघटना स्थापन केली १८५३ ते १८५५ या काळात ते कंपनीने स्थापन केलेल्या शिक्षण मंडळाचे सदस्य होते त्यांनी बॉम्बे असोशियशनच्या वतीने मुंबई विद्यापीठ स्थापनेसाठी प्रयत्न केले. १८ जुलै १८५७ रोजी मुंबई विद्ध्यापिथाची स्थापना झाली तेव्हापासून तर मृत्यू पर्यंत त्या विद्यापीठाचे संस्थापक सदस्य होते . एलिफस्टन निधीचे विश्वस्त म्हणून काम केले.
स्त्रियांबद्दल केलेले कार्य
मुंबई प्रांतात सरकारने बालकन्या हतेचा विषय घेऊन निबंध स्पर्धा आयोजित केली होती यात भाऊ लाड प्रथम आले होते हि प्रथा अमानुष तर आहेच पण हिंदू धर्म शास्त्राच्या विरुद्ध आहे आसे त्यांनी निबधात म्हटले त्यांनी स्त्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिला . डॉ .भाऊ लाड यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांनी स्वखर्चाने मुलींसाठी शाळा सुरु केली त्यांनी या या शाळेस आर्थिक मदत पण केली मुंबईतील लोहार चाळ येथे स्टुडट लिटररी सायटीफिक आसोशियासन या संस्थेचे कन्या हायस्कूल होते डॉ लाड यांनी या शाळेला १६,५०० रुपयांची देणगी दिली पुढे या शाळेला भाऊ दाजी गर्ल्स स्कूल आसे नाव मिळाले ते स्वतः या संस्थेचे १० वर्ष आद्याक्ष होते .बालकन्या कन्या हातेवारही त्यनी टीका केली स्त्री बाल हत्या हा ग्रंथ डॉ दाजी भाऊ लाड यांनी लिहिला .
आपण त्यांच्या ग्रंथ व इतिहास लेखनाविषयी माहिती बघूया १८४५ पासून मुंबईत स्थापन झालेल्या नेगेटिव्ह जनरल लायब्ररीचे ते बरिच वर्ष अध्यक्ष होते .डॉ .भाऊ लाड यांचे इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात उलेखनीय कार्य आहे .त्यासाठी भारतभर प्रवास करून त्यांनी हस्तीलीखीते , शिलालेखांचे शीलालेखाचे ठसे आणि चित्रे यांचे संकलन केले .कालिदासाचा कालनिर्णय , शंकाचे हल्ले , जेन धर्मांची परंपरा , जेन पट्टवितंच कालानुक्रम व हेमाद्रीचा काळ या विषयांवर त्यांनी संशोधनपर ग्रन्थ लिहिले त्यांनी गिरनार पर्वतावरील रुद्रदमन शिलालेख व गुपातांच्या शीला लेखनाचे वाचन केले. १८५५ मध्ये व्यापार व उधोगावर कर बसविणाऱ्या लायसेन्स बिलास भाऊंनी विरोध केला इतिहास संशोधन क्षेत्रात डॉ.भाऊ लाडचे कार्य खूप मोलाचे आहे.
स्वतंत्र्याचे आध्य द्रष्टे Dr.Bhau Daji Lad
गिरनार पर्वतावरील रुद्र्दामनाच्या शीला लेखावरून रुद्रादमन हा चेस्टनचा नातू होता. हे त्यांनी सिद्ध केले लग्नमुंजीत कालवंतिनी नाच करण्याच्या प्रथेस भाऊ लाड यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. .डॉ भाऊ दाजी लाड हे सदनशील राजकीय चळवळी च प्रवर्तक होते ,तसेच ते स्वतंत्र्याचे आध्य द्रष्टे होते डॉ भाऊ दाजी लाड यांचे द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने प्रकाशित करण्यात आले आहे तर मित्रांनो आपण या पोस्ट मधुन मुलांना समाजसुधारकाची माहिती कशी होईल याचा विचार केला आहे.
भाऊ दाजी लाड यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत एक वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले. हे संग्रहालय त्यांच्या नावावर आहे आणि आजही ते मुंबईतील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या संग्रहालयात भारतीय कला, संस्कृती आणि इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू प्रदर्शित आहेत. भाऊ दाजी लाड यांचे योगदान भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्यामुळे भारतीय इतिहासाचे ज्ञान अधिक समृद्ध झाले आणि सामाजिक सुधारणा घडून आल्या. त्यांचे नाव भारतीय इतिहासात आदराने घेतले जाते.
डॉ.भाऊ दाजी लाड यांचे निधन ३१ मे १८७४ रोजी झाले