स्त्री शिक्षणाचा दीप ज्योतिबा फुले
Mahatma Jyotiba Phule -नमस्कार मितारांनो आज आपण महात्मा ज्योतीराव फुले यांची माहिती बघणार आहोत. ज्योतिबा फुले हे एक महान समाज सुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारी होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीवाद आणि स्त्रीभेदभाव यांना आव्हान देण्याचे काम केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि सर्व स्तरातील लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि कादंबऱ्या आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा आजही समाजावर प्रभाव आहे.महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे आध्य सुधारक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक आसे म्हणतात.
फुले हे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक होते. त्यांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली. ज्योतीराव फुले यांचे गाव सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यातील कटगुण हे होते. ज्योतीराव यांच्या आजोबाचे नाव शेरीबा,वडिलांचे नाव गोविंदराव आईचे नाव चिमणाबाई होते .त्यांचे मुल आडनाव गोऱ्हे हे होते. ज्योतीराव क्षेत्रिय माळी समाजातील होते ज्योतीराव यांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत होते त्या मुळे गोऱ्हे आडनाव मागे पडून फुले हे नाव पडले आहे. ११ एप्रिल१८२७ साली ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा ठेवले होते .१८३४ साली ज्योतीराव मराठी शाळेत गेले.१८३४ ते १८३८ या काळात पंतोजींच्या शाळेत ज्योतीबांचे प्राथमिक शिक्षण झाले.
१८४० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी धनकडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री बाई फुले यांच्याशी विवाह झाला. १८४१ ते १८४७ या काळात त्यांनी उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लेटीज साहेब यांच्या प्रयत्नाणे पुण्यातील मिशिणारी शाळेत ज्योतीबांनी इंग्रजी शिक्षण घेतले. १८४८ मध्ये पुण्यात मित्राच्या वरातीत अपमान केल्यामुळे ज्योतिबा सामाजिक सुधारंना कडे वळले महात्मा फुले यांनी काही महिला उध्दाराचे कार्य केळे आहे.
स्त्री शिक्षणाचा पहिला पुरस्कर्ता महात्मा ज्योतीबा फुले
स्त्री शिक्षण = स्त्रियांना मानवी हक्काची जाणीव होऊ नये या इराद्याने लोभी पुरुषानि त्यांना विद्ध्या शिकवण्यास प्रतिबंध केला. महात्मा फुले यांनी ऑगस्ट १८४८ मध्ये बुधवार पेठ पुणे येथे तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली .या शाळेत सावित्री बाई फुले यांनी शिक्षिकेचे काम करू नये म्हणून ब्राम्हण लोकांनी त्यांचा फार छळ केला .पण त्यांनी शिकवणे बंद केले नाही शेवटी सनातनी लोकांनी याबाबत ज्योतीरावांच्या वडिलांकडे तक्रार केली समाज व दडपणात गोविंदरावांनी सावित्रीला शाळेत न जाण्याची आज्ञा केली.ज्योतीरावांना हे पटले नाही शेवटी मतभेद झाल्याने दोघांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गंज पेठेत एका घरात राहण्यास सुरुवात केली. महात्मा फुले यांच्या शेक्षणिक कार्याबद्दल १६ नोव्हेंबर १८८२ रोजी स्त्री शिक्षणाचे आध्य जनक म्हणून ब्रिटीश सरकारने त्यांचा गोरव केला.
ज्योतीबांनी समाज कार्यास सुरवात करताना सर्व प्रथम स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले १८४८ मध्ये बुधवार पेठेतील भीडयांचा वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली १७ सप्टेबर १८५१ ला रस्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली १५ मार्च १८५२ ला वेताळ पेठेत मुलींची शाळा सरू केली मुलींसाठी शाळा सुरु करण्याच्या ज्योतीबांच्या कार्यामागे अहमदनगरच्या मिस फरार या बाईंनी मुलींसाठी सुरु केलेल्या शाळेची प्रेरणा होती याशिवाय नातेवाईक सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून देखील यांच्याकडून देखील यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा दिली. स्त्री शिक्षणाविषयी महत्त्व सांगताना जिच्या हाती पाल्ण्याचीदोरी तीच जगाचा उद्धार करी आसे फुले म्हणत १६ नोव्हेंबर १८५२ रोजी ज्योतीबांच्या शिक्षण कार्याची दाखल घेऊन इग्रज सरकारने पुण्यातील विश्राम बाग येथे मेजर कॉन्डीच्या हस्ते त्यंचा सत्कार केला. १८५२ इं पुन लायब्ररीची स्थापना केली आहे.
समाज सुधारणेचे दिव्य दर्शन महात्मा ज्योतीबा फुले
विधवा पुनर्विवाह १८६४ मध्ये सुरु काळे पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला १८६५ लाविधवांच्या केशवपन बंदीसाठी प्रयत्न करताना तळेगाव ढमधर येथे नाभिक बांधवांचा संप घडवून आणला. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने ८ मार्च १८६४ रोजी पुणे येथे गोखले यांच्या बागेत एका शेणवी जातीतील १८ वर्ष्याच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुराबरोबर केला हा पहिला पुनर्विवाह होता. महात्मा फुले यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले शिक्षणाच्या आभावी सामान्य माणसाची अवस्था पशुप्र्माने होते आसे त्यांचे मत होते .मुठभर लोकांना शिक्षित करून सर्सामान्य माणसाच्या जीवनात काहीच फरक पडणार नाही .थोडक्यात शिक्षण सार्वत्रिक व प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आसवे आसे त्यांचे मत होते.
महात्मा फुले यांचे अस्पृशता निर्मुलन कार्य
१९ व्या शतकात भारतात अस्पृश्यता निर्मुलन आंदोलना ची पाया भरणी महात्मा ज्योतीराव फुले यांनी सर्व प्रथम केली त्यांनी या निर्मुलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्था ची पुनर्रचना केली १८५१ मध्ये अस्पृश्य बांधवांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरु केली ती बंद पडली १८५२ मध्ये अस्पृश्य बांधवांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाळा सुरु केली १८५३ ल पुण्यात महार ,मांग ई लोकांसाठी विद्ध्या शिकविणारी मांडली हि संस्था सुरु केली १८५८ ला या मुलांसाठी तिसरी शाळा सुरु केली १८७३ मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीर नाम प्रसिद्ध केला १८७७ मध्ये दीनबंधू या वृत्तपत्रातून सामाजिक रूढी परंपरा तसेच अस्पृश्य बांधवांच्या परिवर्तनाचे विचार मांडले.
सामाजिक क्रांतीचा सूत्रधार महात्मा ज्योतीबा फुले
महात्मा फुले यांचे शेतकरी बांधवासाठी कार्य = तलाव , बंधारे , धरणे बांधून शेतीला पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे , पिक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंधुकीचे परवाने मिळावेत, कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे,पशुपालनासाठी चालना द्यावी ई शेतकऱ्यांची स्थिती सुधरण्या विषयी सरकारला सूचना दिल्या होत्या. तर मुलांनो आज आपण महत्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी या पोस्ट मधून माहिती बघितली आहे मुलांना समाज सुधारकांची माहिती व्हावी हा आपल्या पोस्टचा उद्धेश आहे.
सर्व समाजाचे कल्याण हेच ध्येय
महात्मा फुले यांच्याविषयी विशेष माहिती ब्राहामाचे कसब या ग्रंथाची आप्र्ण पत्रिका आसी होती महाराष्ट्र देशातील कुणबी ,माली ,मंग ,महार यांस हे पुस्तक ग्रंथ कर्त्याने परम प्रीतीने नगर केले .महात्मा ज्योतीराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले आपण आशा पोस्ट मधून मुलांना समाज सुधारकांविषयी माहिती मिळते. आणि असे हे थोर समाज सुधारक तसेच स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाले .