Pandita Ramabai [संस्कृत पंडिता सामाजिक क्रांतिकारक पंडिता रमाबाई ]

पंडिता रमाबाई – भारतीय सामाजिक सुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या

Pandita Ramabai – नमस्कार मित्रांनो आज आपण पंडिता रमाबाई यांच्या विषयी माहिती बघणार आहोत, तर मुलांनो आशा या थोर स्त्रीचा जन्म २३ एप्रिल १८५८ला झाला. त्यांचे पूर्ण नाव पंडिता रमाबाई सरस्वती होते.  त्यांच्या वडिलांचे नाव आनंत शास्त्री डोंगरे व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते.  लक्ष्मीबाई व आनंत शास्त्री डोंगरे या दाम्पत्याचे हे शेवटचे आपत्य दुष्काळामुळे डोंगरे कुटूंबियाना गाव सोडून तीर्थ यात्रेला जावे लागले. या यात्रे दरम्यान आई वडिलांचे निधन झाले. त्यांची आई वडिलांच्या मृत्यू नंतर बंधू श्री निवास यास सोबत घेऊन रामाबींनी तीर्थ यात्रेच्या निमित्ताने भारत भ्रमण केले. खरतर पंडिता रमाबाई ह्या खूप शिकलेल्या  व सुंदर होत्या. कोलकाता मुक्कामी आपल्या पांडित्याने त्यांनी विद्वानांना  प्रभावित केले, त्यामुळे त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या देण्यात आल्या. पंडिता नावाने प्रसिद्ध त्या एकमेवमहिला समाज सुधारक होत्या.  बंगाली स्त्रियांनी त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण आसे मानपत्र दिले. 

pandita ramabai

समाज सुधारक पंडिता रमाबाई

बरेच आय .सी एस आधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होतो.पण १८८० साली भाऊ श्रीनिवासच्या मृत्यू नंतर रमाबाईने पेशाने वकील बिहारी मेधावी यांचाशी  विवाह केला. कोलकात्याच्या बिपीन बिहारी दास या शुद्र समाजातील वकीलाबरोबर झालेल्या त्यांच्या विवाहाने खळबळ उडाली. पण लग्नानंतर १९ महिन्यानेच त्यांचेही निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपले सारे आयुष्य स्त्रियांच्या उद्धारासाठी  देण्याचे ठरवले त्यांना मनोरमा नावाची कन्या झाली कन्येला सोबत घेऊन १८८२ साली त्या महाराष्ट्रात परत आल्या. पतीच्या निधनानंतर रमाबाई पुण्यात आल्या त्यांची कन्या मनोरमा हिचे देखील अकाली निधन झाले.देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे, आसे त्यांचे मत होते. 

महिला सशक्तीकरणाची प्रणेती पंडिता रमाबाई.

१८२२ साली हंटर कमिशन पुढे साक्ष देताना त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हंटर कमिशनपुढे साक्ष =  १८८३ साली शिक्षण संबधीच्या आयोगापुढे पंडिता रामाबाईंना साक्ष दिली . यावेळी त्यांनी काही मागण्या केल्या 

  • मुलांच्य शाळेतील शिक्षणापेक्षा मुलींच्या शाळेतील शिक्षकाचे पगार जास्त आसावेत .
  • मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षकांप्रमाने इन्स्पेक्टर सुद्धा स्त्री असावी .
  • स्त्रियांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्याव्या .प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे .
  • स्त्रियांना वेद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था करावी .

रमा बाईंनी इग्लंड ,अमेरिका येथे दीर्घकाळ वास्तव्य केलेत्यांनी जपान ,ऑस्ट्रेलियाचाही दोरा केला. २९ सप्टेबर १८८३ रोजी इंग्लंडमधील बॉटीज चर्च मधील रमाबाईनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. रमाबाई यांनी १८८९ मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांनी आपल्या धर्मांतराचे कारण म्हणून रूढीवादी हिंदू धर्माशी असलेले त्यांचे वाढते मोहभंग आणि विशेषतः महिलांप्रती असलेला त्यांचा अपमान सांगितला. रमाबाई च्या धर्मांतरास महात्मा फुले ,न्या. म. गो .रानडे ,गो.ग . आगरकर , डॉ रा .गो.भांडारकरयांनी पाठींबा दर्शविला. १२ जानेवारी १९०४ केशरी च्या अग्रलेखात पंडिता रमाबाईनि मायावी वाघीण तसेच पंडिता एवजी रेवंडर आशी टीका करण्यात आली                                                                  

शारदा सदनाची संस्थापिका आणि  पंडिता रमाबाई नी स्थापन केलेल्या संस्था =

  • आर्य समाज पुणे =या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या स्थिती बद्दल जागृती केली. या संस्थेच्या शाखा अहमदनगर , सोलापूर , पंढरपूर बार्शी , ठाणे ,मुंबई येथे स्थापन केल्या.                                              
  • रमाबाई असोशीयशान = १८८७ साली अमेरिकेतील बोस्टन शहरात रमाबाईनी हि संस्था स्थापन केली.                                   
  •  शारदा सदन .मुंबई = १८८९ या संस्थे मार्फत निराश्रित विधवा ,अनाथ स्त्रियांच्या निवास भोजनाची व्यवस्था.

१८९० मध्ये शारदा सदनचे पुणे येथे स्थलांतर व काही काळाने केडगाव येथे स्थलांतर पुण्यात हि संस्था नवरुपात आली. मार्च १८८६ मध्ये त्या अमेरिकेत गेल्या .शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या आनंदी बाई जोशीच्या पदवीदान समारंभात त्या हजर होत्या. अमेरिकेतच असताना त्या हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त ठरणारी बालोद्यान शिक्षण पद्धती त्यांनी शिकून घेतली .फेब्रुवारी १८८९ मध्ये रमाबाई अमेरिकेहून कलकत्याला आल्या .त्यांनी सोबत दोन विद्यार्थिनी घेऊन शारदा सदन सुरु केले .बळवं विधवा म्हणून येणाऱ्या शरद सदनातील आनंदी बाई कर्वे ह्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या .ज्यांनी नंतर महर्षी दोनदो केशव कर्वे यांच्याशी विवाह केला .१९१९ साली ब्रिटीश सरकारने ‘केसर -ए -हिंद ;हा पुरस्कार देऊन त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा गोरव केला .५ एप्रिल १९२२ रोजी केडगाव येथे यांचा मृत्यू झाला . तर मुलांनो आजच्या पोस्ट मध्ये आपण समाज सुधारक पंडिता रमाबाई यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेतली आहे.

                                                                                                                                               

 पंडिता रामाबीचे साहित्य =  
  • स्त्रीधर्म नीती ,
  • हाय का स्ट हिंदू वूमन
  • बायबलचे मराठी भाषांतर
  • इंग्लंडचा प्रवास
  • युनायटेड स्टेटस्ची लोकस्थिती व प्रवास वृत्त
  • इबारीभाषेचे व्याकरण
  • नवा करार
  • अ टेस्टी मनी.                                                                                                                                     
विधवा स्त्रियांच्या उद्धारक पंडिता रमाबाई

रमाबाईनी अमेरिकेतील वास्तव्या दरम्यान १८८८ साली हाय कास्ट हिंदू वूमन हा हिंदू बालविधवा यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा ग्रंथ लिहिला रमाबाई च्या करायची दाखल घेऊन १९१९ मध्ये बेईतीश सरकारने त्यांना केसर इ हिंद हि पदवी दिली आशा या विद्वान महिलेचे निधन ५ एप्रिल १९२२ रोजी केडगाव येथे झाले त्यंना स्त्रियांच्या मुक्तीची आघ्य प्रवर्तक या शब्दांत त्यांचा महाराष्ट्रात गोरव केला. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या योगदानाबद्दल ओळखले जाते. 

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now