Rajashri Shahu Maharaj | शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणीय कार्य

राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन व कार्य

Rajashri Shahu Maharaj – नमस्कार मित्रांनो आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.शाहू महाराज यांचा जन्म कसबा बावडा [कागलवाडी ], कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंग राव आबासाहेब घाटगे होते. ते कागल परगण्याचे जहागीरदार होते .त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मुळ नाव यशवंतराव होते. १७०८ साली कोल्हापूर स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले .तेथील चोथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी यशवंतराव यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू छत्रपती आसे ठेवण्यात आले. १८८५ साली महाराजांना राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयाचे पाठविण्यात आले. त्यांचे लहान बंधू श्रीमंत बापूसाहेब ,श्रीमंत काकासाहेब व दत्तरावजी इंगळे हे महाराजांसोबत शिक्षण घेत होते .१८८९ साली पर्यंत ते राजकोटला होते .त्यावेळी त्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल होते. 

Rajashri Shahu Maharaj

 

     १८९० ते १८९४ मध्ये महाराजांनी धारवाड येथे सर एस . एम फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा , राज्य कारभार व जागतिक इतिहास आधी विषयांचे परिपूर्ण अध्ययन केले. धारवाड येथे शिक्षण घेत असताना १ एप्रिल १८९१ रोजी महाराजांचा विवाह झाला. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या बडोद्याचे गुनाजीराव खानविलकर यांची कन्या होती विवाहाच्या वेळी त्या ११ वर्षाच्या होत्या.शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या विसव्या वर्षी राजे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार बनले. राजर्षी शाहू महाराजाचा राज्याभिषेक समारंभ मुंबईचे तत्त्कालीन गव्हर्नर लॉर्ड होरीस यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.  

वेदोक्त प्रकरण

२४ मे १९०० ला शाहू महराजांना महाराज हि पदवी धरण करण्याचा अधिकार लाभला. नोव्हेंबर १९०१ मध्ये राजघराण्यातील सर्व धर्मिक वेदोक्त मंत्रांनी करावे आस आदेश महाराजांनी काढला त्यावेळेस राजघराण्याचे विधी करण्याचे वार्षिक ३० ,००० इनाम आपासाहेब यांना मिळाले .अखेर ६ मे १९०२ रोजी महाराजांनी राजोपाध्याय यांना नोकरी वरून काढून टाकले .व त्यांचे वेतन रद्द केले. हे वेदोक्त प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. ब्राम्हण व ब्राम्होतर आशे दोन गात तयार केले. शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांच्या जागी तात्याराव जोशी यांची २५० रुपये वेतनावर नितुक्ती झाली. 

शेक्षणिक सुधारणा

राजर्षी शाहूमहाराज यांनी केलेल्या शेक्षणिक सुधारणा = १ सप्टेंबर १८९५ रोजी राधाबाई केळकर यांची कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षण अधिकारी पदी निवड झाली. २४ सप्टेबर १९११ रोजी महाराजांनी मागास वर्गीय विद्यार्थ्यान साठी फी माफीचा ठराव मंजूर केला. २० मे १९११ रोजी संस्थांत पंधरा टक्के विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा दिली. १९१३ कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरु झाली. २० जानेवारी १९१३ खेड्यातील शाळेत शेतीविषयक शिक्षण सक्तीचे तसेच शिक्षकांना ६ महिने प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले. १९१६ कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आदेश दिला.

  मोफत व प्राथमिक शिक्षण 

 प्रतेक गावात किमान एक शाळा आसवी .व ती शाळा त्या गावात बहुसंखेने असणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवावी आसे महाराजांनी १९१३ साली जाहीर केले.बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु करण्याचा ठराव दरबाराने २५ जुलै १९१७ रोजी केला.

त्याच प्रमाणे सक्तीचे मोफत व प्राथमिक शिक्षण ३० सप्टेंबर पासून सुरु होईल आसा जाहीरनामा केला. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा १९१७ = २४ जुलै १९१७ महाराजांनी जाहीरनामा कडून करवीर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले. शिक्षण योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी शाहूंनी समिती नेमली या समितीने आपला अहवाल शिक्षण अधिकारी रा .ब .डोंगरे यांना सादर केला. २१ व २९ सप्टेंबर १९१७ रोजी आसे जाहीर केले.

सक्तीचे मोफत शिक्षण 

सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाची हि योजना मुलींच्या बाबतीत लागू करण्यात येणार नाही या कायद्यानुसार शिक्षणास योग्य वयाची मुले म्हणजे ७ ते १४ वर्ष वयाची मुले ठरविण्यात आली. या वयातील मुलांच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठविणे बंधनकारक होते. सक्तीच्या शिक्षणाच्या कायधातील तरतुदी सक्तीच्या शिक्षण योजनेसाठी १ लाख रुपये खर्च करण्याची घोषणा केली यासाठी ८० हजाररुपये दरबारच्या खजिन्यातून व २० हजार रुपये देवस्थान निधीतून देण्याची तरतूद शिक्षण योग्य वय झालेल्या मुलांना शाळेत पाठविण्याची आई वडिलांवर सक्ती, मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या आई वडिलांना दरमहा दहा रुपय दंड लावला शेती कामात मदत करणाऱ्या विद्यार्ध्यांना १५ दिवसाची सवलत दिली. त्यांनी वर्षभरात संस्थानात ९६ शाळा सुरु केल्या सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानात चीरीपेटा येथे सुरु केली.

३ सप्टेबर१८१८ रोजी विद्यापीठ हायस्कूल ची स्थापना केली. १९१८ रोजी राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे हस्तांतरित केले मातम फुले यांच्या शेक्षणिक कार्याचा महाराजांवर प्रभाव होता १९२० रोजी महाराजांनी अस्पृश्य बांधवांच्या विद्ध्येच्या उन्नतीसाठी १० हजार रुपयांच्या प्रोमिसरी नोट तयार करून त्यातील व्याजातून दरमहा ५ रुपयाने ८ शिष्यवृत्ती सुरु केल्या  यापेकी ३ शिष्यवृत्ती अस्पृश्य समाजातील मुलींसाठी होत्या.                                

सामाजिक सुधारणा       

शाहू महाराजांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा २६ जुळली १९१७ रोजी पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत केला १९१७ साली त्यांनी आंतरजातीय विवाहासाठी पटेल बिलास पाठिंबा दिला फेब्रुवारी १९१८ मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संमत केला.                                           

                   १९९६ साली दुष्काळ पडला तेव्हा शाहू माराजांनी सर्व जाती जमातीच्या विध्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले .सुरुवतीला यात सर्व जातींचे विधार्थी होते पण नंतर यात जातीयेता पाळण्यात येऊ लागली .अखेर ते वसतिगृह १९११ साली बंद पडले या आनुबावामुळे सर्व जातीसाठी एकाच वसतिगृह काध्के तर त्यात जाती भेदामुळे मुळे येणार नाहीत म्ह्नुन्जात्वर वसतिगृह काढली शिक्षणाचा प्रसार जसा जास्त होईल तसा जातीभेद कमी होईल व नंतर आशी जातीय वसतिगृहे काढण्याची गरज पडणार नाही आसे त्यांना वाटत होते .रखमाबाई केवलकारांची मुलगी त्यांच्या मदतीने वेद्ध्कीय शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकली .शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी असलेल्या शाळांची संख्या वाढविली .त्यांना फी माफीची सवलत दिली कोल्हापुरात महार व चांभार यांच्यासाठी रात्रीची शाळा होती महाराजांनी १९०६ साली आदेश देऊन या शाळेला कायमस्वरूपी मान्यता दिली.

Rajashri Shahu Maharaj हे भारतातील एक महान समाज सुधारक आणि लोकशाहीवादी राजा होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानात अनेक पुरोगामी सुधारणा केल्या होत्या. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र आणि भारतातील समाज परिवर्तन मोठ्या प्रमाणात झाले.

आरक्षणाचे जनक | Rajashri-Shahu-Maharaj

शाहू महाराजंनी बहुजन समाजासाठी मागासलेल्या लोकांसाठी शासकीय आणि निमशासकीय नोकर्यांत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा हिकुम दिला प्रतेक खात्याच्या प्रमुखाने हुळूमांतर भरलेल्या जागांचा तिमाही आहवाल सादर केला. 

राजर्षी शाहू महाराजाची प्रसिद्ध वचणे 

“राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाजाच्या सेवेची स्वीकारलेले व्रत मी कदापि सोडणार नाही”.  “कामगारांनो संघटीत व्हा आणि आपले हक्क प्राप्त करून घ्या तुम्हाला हे सांगताना मला कसलेच भय वाटत नाही कि हे युग संघटनेचे आहे या उद्गाराबद्दल मला माझी राजवस्त्रे जरी उतरावी लागली तरी त्याची मला पर्वा नाही”.तर आशा या थोर समाज सेवकाचे निधन मुंबई येथील पन्हाळा लॉज मध्ये झाले.         

आशा प्रकारे आपण राजर्षी शाहू महाराज खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जात होते.या थोर समाज सुधारकाविषयी आपल्या आजच्या पोस्टमधून माहिती जाणून घेतली आहे.

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now