जगन्नाथ शंकर सेठ |समाजसेवक आणि उद्योगपती
नमस्कार मित्रांनो आज आपण जगन्नाथ शंकर सेठ यांची माहिती बघणार आहोत.जगन्नाथ शंकर सेठ यांचे मुंबई प्रांताच्या विकासासाठी खूप मोलाचे योगदान आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ गाव हे ठाणे जिल्यातील मुरबाड हे आहे. त्यांचे मूळ आडनाव मुरकुटे आहे. जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. नाना शंकर सेठ यांच्या शेक्षणिक व सामाजिक सुधारणा बॉम्बे नेटिव्ह एजुकेशन सोसायटी १८२४ साली सुरु झाली. लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी १८२२ साली शिक्षण प्रसारासाठी हेंद शाळा व शाळा पुस्तक मंडळीस्थापना केली १८२४ मध्ये या संस्थेचे बॉम्बे नेटिव्ह एजुकेशन सोसायटीत रुपांतर झाले.
१८४५ मध्ये स्टुडटस कम्युलरी आणि सायन्टीफिक सोसिओच्या स्थापनासाठी राजकीय आर्थिक मदत केली. डॉ .भाऊ लाड , दादाबाई नारोजी, विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली. १८३४ ला मुंबईत एलीफ्नस टन कॉलेज्च्या स्थापनेत पुढाकार केला मुंबई इलाक्यातील बोर्ड ऑफ एजुकेशन, १८४० चे सदस्य या बोर्डावर ३ सरकारी सदस्य व ३ बॉम्बे निगेटिव्ह एजुकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात. या संस्थेचे १८५६ मध्ये शिक्षण खात्यात रुपांतर झाले मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते ते जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबई विध्यापिठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता .
नाना शंकर शेठ मुरकुटे | शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानकर्ता
मुंबईत रेल्वे सुरु करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली. आणि त्यांनी ती कल्पना सर्वप्रथम त्यांचे मित्र जमशेठजी जीजीभोय यांच्याकडे माडली. जगन्नाथ शंकर सेठ आणि जमशेठजी जीजीभोय 1845 साली ‘इंडियन रेल्वे असोसिएशन’ची स्थापना केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि 1 ऑगस्ट 1849 रोजी ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ ची स्थापना झाली.दक्षिण मुंबईतील गिरगावात उघडलेल्या विद्यार्थी वाचनालयासाठी त्यांनी भरपूर पैसा दिला. हिंदू समाजाचा तीव्र विरोध असतानाही या मुलींच्या शाळेच्या स्थापनेसाठी खूप पैसा गुंतवला गेला. त्यांनी आपल्या शाळांमध्ये इंग्रजीसह संस्कृत शिकवण्याची व्यवस्था केली. गिरगावातच त्यांनी संस्कृत सेमिनरी आणि संस्कृत ग्रंथालयाची स्थापना केली.
२६ ऑगस्ट १८५२ रोजी त्यांनी ‘बॉम्बे असोसिएशन’ या नावाने राजकीय पक्षाची स्थापनाही केली ज्यामध्ये तत्कालीन मुंबईतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. त्याचे पहिले अध्यक्ष सर जमशेटजी जेजीभाई होते. काही कालांतराने दादाभाई नौरोजी आणि इतर अनेक तरुणही त्यात सामील झाले.
जनतेची दु:ख सदन शीर मार्गाने सरकारपुढे मांडण्या साठी दादाबाई नारोजी व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली . १८६१ च्या कायद्यानुसार बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर नामांकित झालेले ते पहिले भारतीय ठरले. जगन्नाथ शंकर सेठ बॉम्बे बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य बनले. ते मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य देखील होते, आणि ग्रँट रोड येथे शाळेसाठी आणि थिएटरसाठी जमीन दान म्हणून ओळखले जाते.जगन्नाथ शंकर सेठ यांचे निधन ३१ जुलै१८६५ रोजी झाले नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते या शब्दांत आचार्य प्र.के अत्रे यांनी त्यांच्या कार्याचा गोरव केला.
मुंबई निर्माते | मुंबईच्या विकासाचे शिल्पकार नाना शंकरशेट
१८६१ साली नाना शंकरशेट यांना तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात स्थान मिळणे हे मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. विधिमंडळात प्रवेश करून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपले पाऊल ठेवले आणि पुढे अनेक निर्णय प्रक्रियांवर प्रभाव टाकला. त्यांच्या या प्रवेशामुळे मुंबईच्या विकासात एक नवे अध्याय सुरू झाला. १८६२ मध्ये नाना शंकरशेट यांची मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. ही नियुक्ती त्यांच्या राजकीय प्रभावाची द्योतक होती. या पदावर असताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करण्यात नाना शंकरशेट यांचे योगदान अतुलनीय आहे. या कायद्यामुळेच मुंबई महापालिकेची स्थापना झाली. याचा अर्थ असा की, आज आपण पाहत असलेली मुंबई महापालिका ही नाना शंकरशेट यांच्या दूरदृष्टीचेच फळ आहे. त्यांनी या कायद्याद्वारे मुंबईच्या नागरिकांना स्वशासन देण्याचा प्रयत्न केला आणि मुंबईच्या विकासाची जबाबदारी नागरिकांच्या हातात सोपवली.
नाना शंकर सेठ थोर समाज सुधारक |
३१ जुलाई १८६५साली जगन्नाथ शंकर सेठ उर्फ नाना शंकर सेठ यांचे निधन झाले.नाना शंकरशेट हे केवळ एक व्यापारी नव्हते तर ते एक दूरदृष्टीचे राजकारणी, समाज सुधारक आणि मुंबईच्या विकासाचे शिल्पकार होते. त्यांच्या योगदानामुळे मुंबई आज एक महानगर म्हणून ओळखली जाते. त्यांच्या कार्याला आजही आपण नतमस्तक होतो. त्यांनी देशासाठी खूप सुधारणा केल्या अश्या या थोर समाजसुधारकाची माहिती आपण या पोस्ट माध्ये थोडक्यात पहिली आहे.